सरहद्दीवरील तणाव निवळला; शेअर बाजार निर्देशांकात वाढ

मुंबई-जागतीक बाजारातून आज सकारात्क संदेश आले. त्याचबरोबर चीन आणि भारतातील सरहद्दीवरील तणाव निवळला आहे. या कारणामुळे आज शेअर बाजारात सकाळपासून बरीच खरेदी होऊन निर्देशांकात वाढ झाली. गेल्या चार दिवसापासून निर्देशांक एकतर्फी वाढत आहेत.

माहीती तंत्रज्ञान, ग्राहक वस्तू, वाहन आणि औषधी क्षेत्राकडे आज गुंतवणूकदारांचा ओढा होता. त्याचबरोबर आज रूपयाच्या मुल्यातही वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदी केल्याचे काही ब्राकेर्सनी सांगीतले. तांत्रीक दृष्टीकोणातून महत्वाचा 9900 चा टप्पा आज निफ्टीने पुर्ण केला.

इन्फोसिस कंपनीच्या मोठ्या गुंतवणूकदारांच्या सूचनेनुसार आता नंदन निलेकणी यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली आहे. त्याचबरोबर संचालक मंडळातील काही सदस्यानी राजीनामे दिले असल्यामुळे आता या कंपनीचे कामकाज संस्थापकाच्या ईच्छेनुसार चालू शकणार असल्यामुळे गेल्या काही दिवसापासून या कंपनीचे शेअर वधारत होते. आजही इन्फोसिस कंपनीच्या शेअरच्या भावात 3.14 टक्के वाढ झाली.

आज बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 154 अंकानी म्हणजे 0.49 टक्‍क्‍यानी वाढून 31750 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 55 अंकानी म्हणजे 0.57 टक्‍क्‍यानी वाढून 9912 अंकावर बंद झाला. गेल्या तीन सत्रात सेन्सेक्‍स 337 अंकानी वाढला आहे.

या वर्षात आतापर्यंत खरेदीसाठी वातावरण चांगले असल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकात 7 टक्‍क्‍याची वाढ नोंदली गेली आहे. त्यामुळे शेअर बाजारातील कंपन्याचे बाजार मुल्य 8.5 लाख कोटी रूपयानी वाढले आहे. या वर्षात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदीबरोबरच विक्रीही केली आहे. तरीही या गुंतवणूकदारांनी या काळात भारतीय शेअर बाजारात 8696 कोटी रूपये गुंतविले अवल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)