सरस्वती विद्यालयात ई-प्रशासन प्रणालीचे उद्‌घाटन

आकुर्डी – येथील नवनगर शिक्षण मंडळाच्या श्री सरस्वती विद्यालयात ई-प्रशासन प्रणालीचे उद्‌घाटन संस्थेच्या संचालिका डॉ. अश्विनी दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक, सचिव प्रा. गोविंदराव दाभाडे, ई-प्रशासन प्रमुख प्रकाश निकम, मुख्याध्यापक राजू माळे, प्राचार्या साधना दातीर, पर्यवेक्षक प्रदीप काळोखे, सुरेखा हिरवे आदी उपस्थित होते. ई- प्रशासन प्रणालीची माहिती देताना मुख्याध्यापक राजू माळे म्हणाले की, शालेय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हजेरी पत्र, बोनाफाईड, दाखले, निकालपत्रके, इत्यादीमध्ये खर्च होणारा वेळ वाचून अध्यापनासाठी व विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी उपयोग होणार आहे.

-Ads-

पेपरलेस शालेय कामकाजासाठी ई-प्रशासन प्रणालीचे योगदान या विषयाची माहिती प्रकाश निकम यांनी दिली. पर्यवेक्षक प्रदीप काळोखे यांनी ई-प्रशासनाची शिक्षकांसाठी उपयुक्तता याविषयी माहिती दिली. प्रास्ताविक सुहासिनी वैद्य यांनी केले. सूत्रसंचालन भारती भोंगाडे यांनी केले. तर आभार माधुरी सोनावणे यांनी मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)