सरस्वतीकुंज काव्यसंग्रहाचे प्रकाशन

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी भागातील राजेवाडी येथील राष्ट्रीय धावपटू सरस्वती लक्ष्मण साबळे यांच्या सरस्वतीकुंज या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जिल्हा परिषदेच्या सदस्या रुपाली जगदाळे आणि बॅंक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी सुभाष साबळे यांच्या हस्ते राजेवाडी येथे नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी डॉ. पवन साबळे, प्रकल्पस्तरीय कमिटीचे अध्यक्ष संदीप साबळे, चिखली गावच्या सरपंच अनिता आढारी, पोलीस पाटील विजय केंगले, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक लहू घोडेकर, सहशिक्षक एकनाथ मदगे, यमना साबळे, संदीप माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

काव्यसंग्रहात सामाजिक वास्तव दर्शन, ज्वलंत प्रश्‍न, निसर्गाचे महत्व, स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, स्त्रियांची पिळवणूक या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न कवितांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)