सरसंघचालकांच्या कुत्र्याच्या उपमेवर विरोधकांचे टिकास्त्र

नागपुर/ मुंबई: सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल अमेरिकेतील हिंदु अधिवेशनात बोलताना कुत्रा आणि सिंहाचे उदाहरण देत जे वक्तव्य केले आहे त्याला सगळ्याच विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. मोहन भागवत यांनी विरोधकांना उद्देशनू कुत्र्याची उपमा दिली असून त्यांची ही मानसिकता हिंदु तत्वांना धरून नाही अशी टिका विरोधी पक्षांनी केली आहे पण संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी मात्र सरसंघचालकांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

शिकागो येथील हिंदु कॉंग्रेस अधिवेशनात बोलताना सरसंघचालक भागवत म्हणाले होते की, सिंह हा जरी जंगलचा राजा असला तरी तो जर एकटा पडला तर जंगली कुत्र्यांची टोळी त्याला नेस्तानबुत करून टाकते त्यामुळे हिंदुंनी एकटे न पडता संघटीतपणे स्वताचा विकास करून घेतला पाहिजे. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेताना भारीप बहुजन संघाचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले की सरसंघचालकांनी विरोधकांना उद्देशून जंगली कुत्र्यांची उपमा दिली आहे. ही त्यांची विरोधकांविषयीची मानसिकता आहे. महाराष्ट्रप्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्या पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की त्यांची ही विचारसरणीच हिंदु विरोधी आहे. त्यांना केवळ हिंदु जातीजातींमध्ये भांडणे लावायची आहेत. त्यांनी जातीजातींमध्ये हिंदुंची विभागणी करणे थांबवावे. सर्वच हिंदु सिंह आहेत आणि अन्य धर्माचे लोकही सिंहच आहेत असे ते म्हणाले.

कॉंग्रेसचे सचिन सावंत म्हणाले की संघाचेच तत्वज्ञान हिंदु विरोधी आहे. त्यांनी कायम दुसऱ्या जाती आणि धर्माविषयी विद्वेष पेरला आहे असे ते म्हणाले. अन्य धर्मियांना कुत्र्याची उपमा देणे चुकीचे आहे असेही सावंत यांनी नमूद केले. एमआयएम पक्षाचे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे की स्वताच्या धर्माला सिंहांची उपमा देऊन अन्य धर्मियांचा उपमर्द करण्याचे काम त्यांनी या वक्तव्याद्वारे केले आहे. संघाच्या प्रमुखांची ही भाषा लोक नाकारतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी सरसंघचालकांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की सरसंघाचालकांनी नेहमीच हिंदुंच्या आणि देशाच्या हिताची भुमिका घेतली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)