सरळसेवेने भरतीसाठी शासनाला साकडे

1,400 कर्मचाऱ्यांची गरज


अत्यावश्‍यक सेवांचा खोळंबा

पुणे – सरळसेवा भरती 2015 च्या अध्यादेशानुसार, महापालिकेच्या अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या विभागांसाठी तातडीने 1,400 पदे भरण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी महापालिका प्रशासनाने पुन्हा राज्यशासनाकडे विचारणा केली आहे. आरोग्य, पाणीपुरवठा, अग्निशमन दल तसेच घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण विभागांसाठी ही कर्मचारी भरती होणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.

राज्यशासनाने महापालिकेसाठी स्वतंत्र सेवा नियमावली मंजूर केली आहे. त्यानुसार, महापालिकेकडून आपल्या वेगवेगळ्या विभागांसाठी आवश्‍यक असलेल्या कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. मात्र, राज्यशासनाने अत्यावश्‍यक सेवांसाठी सरळ सेवेने भरती करण्यासंदर्भात 2 जून 2015 रोजी स्वतंत्र निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेची सेवा नियमावली असताना या निर्णयानुसार, सरळसेवा भरती करणे शक्‍य आहे का, याबाबत पालिकेने मागील वर्षी नोव्हेंबर 2017 मध्ये विचारणा करण्यात आली होती.

तसेच काही पदांच्या भरतीबाबत सेवा नियमावलीमधील तरतुदीमधून सवलत देण्याची विनंती राज्यशासनाकडे करण्यात आली होती. मात्र, शासनाकडून त्याबाबत अजून काहीच निर्णय महापालिकेस कळविण्यात आलेला नाही.

मात्र, त्यावेळी महापालिकेच्या सर्वच अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत असून महापालिके ठेकेदारांच्या माध्यमातून या सेवांसाठी कर्मचारी घ्यावे लागत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा 6 एप्रिल 2018 रोजी नगर विकास विभागास पत्र पाठवून राज्यशासनाचा सरळ सेवा भरती नियम महापालिकेस लागू आहे किंवा नाही आणि लागू नसल्यास अत्यावश्‍यक सेवांसाठी ही सरळसेवा भरती करण्यास सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)