सरलेल्या संवत्सरात शेअर निर्देशांकात केवळ 7% वाढ 

मुंबई – सरलेल्या संवत्सर 2074 मध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 2407 अंकानी म्हणजे 7 टक्‍क्‍यांनी वाढला तर निफ्टी केवळ 319 अंकानी म्हणजे 3 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे शेअर बाजारांनी जारी केलेल्या माहितीवरून दिसून येते. या वर्षात सुरुवातीच्या काळात निर्देशांक चांगले वाढले होते. मात्र नंतर बिगर बॅंकिंग वित्तीय कंपन्यातील भांडवल सुलभतेच्या मुद्द्यावरून निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरले.

दरम्यात देशातील आणि परदेशातील संदिग्ध परिस्थितीत काल निर्देशांकात थोडी घट झाली होती. आजही त्याच वातावरणात निर्देशांकात थोडी वाढ झाली. मंगळवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सक्‍स केवळ 40 अंकानी म्हणजे 0.12 टक्‍क्‍यांनी वाढून 34991 अंकावर बंद झाल्याचे दिसून आले. काल सेन्सेक्‍स 60 अंकानी कमी झाला होता.

त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 6 अंकानी वाढून 10530 अंकावर बंद झाला.
आगामी काळात शेअरबाजाराना सुट्या आहेत. त्याचबरोबर अमेरिकेत महत्त्वाच्या निवडणुका चालू आहेत. त्यामुळे देशातील किंवा परदेशातील गुंतवणूकदार सध्या मोठे व्यवहार करण्याच्या मनस्थितीत नाहीत असे चित्र बाजारात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)