सरपंच 59, तर सदस्यपदासाठी 198 अर्ज वैध

खेड तालुक्‍यातील नऊ ग्रामपंचायतींची रणधुमाळी
राजगुरूनगर- खेड तालुक्‍यातील नऊ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदासाठी 60 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी एक अर्ज बाद झाला आहे, तर सदस्य पदाच्या निवडीसाठी 205 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते, त्यापैकी सात जणांचे उमेदवारी अर्ज बाद (अवैध) झाले आहेत.
खेड तालुक्‍यातील नऊ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसह धुवोली ग्रामपंचायतीच्या अनुसुचित जमाती महिला सरपंचपदाची पोटनिवडणूक कार्यक्रम सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मंगळवारी (दि.11) शेवटचा दिवस होता तर बुधवारी (दि. 12) अर्जांची छाननी झाली. यामध्ये सरपंच पदासाठी दाखल झालेल्या 9 अर्जांपैकी धामणे येथील एक उमेदवाराचा तर सदस्य पदासाठी ग्रामपंचायत संतोष नगर 26 पैकी 1, वाकी बुद्रुकच्या 43 पैकी 2, वडगाव घेनंदच्या 30 पैकी 4 उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज (नामनिर्देशनपत्र) शनिवारी (दि. 15) दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेण्यासाठी वेळ आहे. त्याच दिवशी निवडणुक चिन्हाचे वाटप होणार आहेत. बुधवारी (दि.26) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर मतमोजणी गुरुवारी (दि. 27) सकाळी आठनंतर तालुक्‍याच्या ठिकाणी घेतली जाणार आहे.
चौकट : सरपंच व सदस्यपदासाठी छाननीत वैध ठरलेले उमेदवारी अर्ज
गोरेगाव (5, 12), भोमाळे (4, 7), संतोषनगर (6, 25), वाकी बुद्रुक (10, 41), जऊळके खुर्द (4, 12), कोहींडे बुद्रुक (9, 32), सोळू (5, 30), वडगाव घेनंद (9, 25), धामणे (8, 13) , धुवोली (1).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)