कळंबी येथील सरपंच व ग्रामसेवक यांचेवर कारवाई व्हावी यासाठीचे निवेदन सहायक गटविकास अधिकारी यांना देताना अधिक सावंत व इतर

वडूज, दि. 12 (प्रतिनिधी) – कळंबी येथील अतिक्रमित रस्ता जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांचा रस्ता खुला करण्याबाबत आदेश असतानाही कळंबी येथील सरपंच व ग्रामसेवक टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, याबाबतचे निवेदन तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना भारतीय मराठा महासंघाचे तालुका उपाध्यक्ष अधिक सावंत यांचेसह ग्रामस्थांनी दिले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे कळंबी येथील गट नं 371, 479, 470 यामधून स्मशानभूमी ते सिद्धनाथ मंदिराकडे पूर्व-पश्‍चिम रस्ता आहे. त्यामध्ये झालेले अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी ग्रामसेवक व सरपंच यांना आदेश दिले आहेत. मात्र, यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने या आदेशाची टाळाटाळ करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे म्हटले आहे. जर या मागणीचा विचार झाला नाही तर भारतीय मराठा महासंघाच्यावतीने कळंबी येथे उपोषण करण्यात येणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी भारतीय मराठा महासंघ खटाव तालुका उपाध्यक्ष अधिक सावंत, मल्हारी ढोले अभय जाधव, विवेक जाधव, अक्षय शिंदे, बाबासो फडतरे, सचिन घाडगे उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)