सरपंचपदासाठी शंभर अर्ज दाखल

संग्रहित छायाचित्र

आज छाननी; सदस्यत्त्वासाठी 197 अर्ज
अकोले – अकोले तालुक्‍यातील 21 ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज अखेरच्या दिवशी सरपंचपदासाठी शंभर अर्ज दाखल झाले आहेत, तर सदस्यांच्या 153 पदासाठी 197 अर्ज दाखल झाले आहेत.
गावनिहाय दाखल अर्ज पुढीलप्रमाणे : लाडगाव (4), देवगाव (11), मुतखेल (12),वांजूळशेत-पुरुषवाडी (9), रेडे (17),कोहणे (6), रतनवाडी (10), पिंपळदरावाडी (13),जहागीरदरावाडी (9), पेढेवाडी (9), पाचपट्टावाडी (10), तिरढे-शिवाजीनगर (13), कुमशेत (5), पेंडशेत (7), सुगाव बुद्रुक (17), पाचनई (8), अंबीत-शिरपुंजे खुर्द (9), शिसवद (8),बारी (7), साम्रद (6), कोकणवाडी (7). सरपंचपदासाठी दाखल झालेले अर्ज असे- लाडगाव (3), देवगाव (8), मुतखेल (13), वांजूळशेत-पुरुषवाडी (6), रेडे (7), कोहणे (7),रतनवाडी (7), पिंपळदरावाडी (4), जहागीरदरावाडी (3), पेढेवाडी (5), पाचपट्टावाडी (2),तिरढे-शिवाजीनगर (4), कुमशेत (3), पेंडशेत (2), सुगाव बुद्रुक (2), पाचनई (4),अंबीत-शिरापुंजे खुर्द (5), शिसवद (4), बारी (7), साम्रद (2), कोकणेवाडी (2)
21 ग्रामपंचायतींपैकी फक्त दोन गावे बिगर आदिवासी व पूर्व भागातील आहेत. त्यात सुगाव बुद्रुक या मोठ्या गावचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने तेथे केवळ दोन अर्ज आले आहेत. रेडे येथे महिला राखीव पद असून तेथे सात अर्ज दखल झाले आहेत. या अर्जाची उद्या (दि. 12) छाननी आहे, तर 15 तारखेला माघार व चिन्ह वाटप होणार आहे. निवडणूक मतदान 26 तारखेला सकाळी साडेसात ते सायंकाळी सायंकाळी पर्यंत चालेल. दुसऱ्या दिवशी अकोले येथे तहसीलदार कार्यालयात सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल व दुपारी एक वाजेपर्यंत निकाल हाती येतील, असे नायब तहसीलदार जगदीश गाडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)