सरन्यायाधीश महाभियोग प्रकरण : कॉंग्रेससह ७ पक्ष एकत्र

नवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी काँग्रेससह ७ पक्षांमध्ये एकमत झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत या प्रस्तावावर सर्व पक्षांच्या नेत्यांनी स्वाक्षरी केली असल्याचे म्हटले जात आहे.

कॉंग्रेससोबत ७ पक्षातील तब्बल ६४ खासदारांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. मुळात यावर ७१ खासदारांनी स्वाक्षरी केली होती परंतु, यातील ७ खासदार निवृत्त झाल्याने याची संख्या ६४ वर आली आहे. या पक्षांमध्ये समाजवादी पक्ष, सीपीआय, सीपीएम, आणि मुस्लीम लीगचा समावेश आहे. दरम्यान, या सर्वांनी हा प्रस्ताव उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे सुपूर्द केला असल्याचे सांगण्यात येत आहे. विरोधी नेत्यांमध्ये गुलामनबी आझाद, के.टी.एस. तुसली, अभिषेक मनू सिंघवी, कपिल सिब्बल, एनसीपीच्या वंदना चव्हाण आणि सीपीआयचे के.डी.राजा यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)