सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला

नवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी फेटाळला. विरोधी पक्षाच्या राज्यसभा खासदारांनी महाभियोगाचा प्रस्ताव दिला होता.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर गैरवर्तणूक व अधिकारांचा गैरवापर असे दोन प्रमुख आरोप ठेवून शुक्रवारी काँग्रेससह सात विरोधी पक्षाच्या खासदारांनी महाभियोग प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर ७१ खासदारांच्या सह्या होत्या. मात्र, त्यातील सात खासदार हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत.

रविवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपल यांच्यासह कायदेतज्ज्ञांसोबत सल्लामसलत केली होती. त्यानंतर आज सकाळी उपराष्ट्रपतींनी हा निर्णय फेटाळून लावला. हा प्रस्ताव फेटाळताना त्यांनी कोणते कारण दिले, हे मात्र समजू शकलेले नाही. उपराष्ट्रपतींनी प्रस्ताव फेटाळला तर सुप्रीम कोर्टात जाऊ, असा इशारा काँग्रेसने यापूर्वीच दिला होता. त्यामुळे काँग्रेस आता सुप्रीम कोर्टात जाणार, असे दिसते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)