सरन्यायाधीशांना हटवण्यासाठी काँग्रेस महाभियोग प्रस्ताव आणणार ?

नवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेस महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी काँग्रेसने सुरु केली आहे. या महाभियोगासंबंधी निर्णय घेण्यासाठी आज संसद भवनात विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. सीबीआय न्यायाधीश ब्रीजगोपाल लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने अन्य विरोधी पक्षांच्या मदतीने सरन्यायाधीशांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केली आहे.

न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. आझाद विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन महाभियोग प्रस्ताव आणण्याबद्दल चर्चा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

-Ads-

दरम्यान, १२ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी सर्वात पहिल्यांदा मुख्य न्यायमुर्ती दीपक मिश्रा यांना हटवण्यासाठी महाभियोग प्रस्तावाची चर्चा झाली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)