सरन्यायाधिशांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल

नवी दिल्ली – देशाचे सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करीत विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर विविध पक्षांच्या 71 खासदारांच्या सह्या आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकैय्या नायडू यांच्याकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. असा प्रस्ताव सादर करण्यासाठी किमान 50 सदस्यांच्या सह्या असणे आवश्‍यक आहे. ज्या 71 खासदारांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत त्यातील 7 सदस्य निवृत्त झाले आहेत. तरीही ही संख्या 50 च्या वर असल्याने तो प्रस्ताव विचारासाठी घेणे सरकारसाठी बंधनकारक ठरले आहे.

या संबंधात माहिती देताना कॉंग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी सांगितले की गेल्या काही दिवसांपासून सरन्यायधिशांचा कारभार पक्षपातीपणाचा राहिला आहे याची जाहीर ओरड अनेक वेळा झाली आहे. न्यायालयाची स्वायत्तता धोक्‍यात आली आहे हे खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच नमूद केले आहे. त्यामुळे आमच्यावर ही वेळ आली आहे. अशी वेळ येणे दुर्देवी आहे. पण सरन्यायाधिशांची वर्तणुक पहाता त्या अनुषंगाने काही तरी कृती करणे आवश्‍यक ठरले होते. या महाभियोग प्रस्तावावर कॉंग्रेस खेरीज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी, मुस्लिम लीग आदि पक्षाच्या खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कॉंग्रेसचे राज्यसभेतील नेते गुलामनबी आझाद यांनी या प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले आहे.सरन्यायाधिशांनी घटनात्मक आदर्शांचे उल्लंघन केले असल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे असे त्यांनी नमूद केले आहे. कपिल सिब्बल म्हणाले की सरन्यायाधिश ज्या प्रकारे सध्या खटल्यांविषयीचे निर्णय घेत आहेत ते पहाता त्यांच्यावर महाभियोग आणण्याखेरीज आमच्यापुढे दुसरा पर्याय उरला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)