सरदार शिवाजीराव इंगळे यांचा शौर्यदिन साजरा

खळद- स्वराज्याच्या पहिल्या लढाईत धारातीर्थी पडलेले वाळुंज गावचे सरदार शिवाजीराव इंगळे यांचा 370वा शौर्यदिन वाळुंज येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पुरंदर तालुक्‍यातील विविध मान्यवरांनी सरदार शिवाजीराव इंगळे यांच्या समाधीस पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. शिवव्याख्याते ऍड. उमेश सणस यांनी शिवचरित्र व सरदार इंगळे यांचे शौय, पराक्रम आणि इतिहासाला उजाळा दिला. यावेळी आयोजित कार्यक्रमात भोर पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव, पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, उपसभापती दत्तात्रय काळे, गणेश मुळीक, माजी सरपंच सदाशिव चौरे, गोविंद इंगळे, धीरज जगताप, अंकुश इंगळे, शांताराम इंगळे, प्रमोद इंगळे, शांताराम म्हेत्रे, सतीश इंगळे, विजय इंगळे, दत्तात्रय म्हेत्रे, दत्तात्रय इंगळे, राहुल इंगळे आदी उपस्थित होते. यावेळी सरदार शिवाजीराव इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
42 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)