सरदार पटेल यांच्या जगातील सर्वांत उंच पुतळ्याचे 31 ऑक्‍टोबरला अनावरण

नवी दिल्ली:  गुजरातेत देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचे पुढील महिन्यात 31 ऑक्‍टोबर रोजी अनावरण होणार आहे. 182 मीटर उंचीचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे अशी माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज येथे बातमीदारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, हा पुतळा देशाच्या ऐक्‍याचे प्रतिक ठरेल. नरेंद्र मोदी यांनी सन 2013 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना असा पुतळा उभारण्याची घोषणा केली होती.

भारतीय जनता पक्षाने साऱ्या देशातून माती, पाणी आणि लोखंड आणून या पुतळ्याची उभारणी केली आहे. सरदार पटेल हे जरी कॉंग्रेसचे नेते असले तरी ते साऱ्या देशाला आणि भाजपला विशेष प्रिय आहेत त्यांचे जगातील सर्वात मोठे स्मारक उभारण्याचा भारतीय जनता पक्षाचा संकल्प होता तो या निमीत्ताने पुर्णत्वास जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)