सरदार पटेल, इंदिरा गांधी यांना आदरांजली

पिंपरी – स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 143वीं जयंती आणि भारताच्या माजी आणि एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 34व्या पुण्यतिथी निमित्त शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे त्यांना आदरांजली अर्पित करण्यात आली.

पिंपरी चिंचवड कॉंग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची 143वीं जयंती आणि इंदिरा गांधी यांना अजमेरा कॉलनी कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्वप्रथम ज्येष्ठ कॉंग्रेसी नेते ऍड. जयराम शिंदे आणि माजी नगरसेविका निगार बारस्कर ह्यांनी इंदिरा आणि वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. पिंपरी चिंचवड कॉंग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मंगल, ऍड. सरिता जामनिक आणि नगर जिल्हा कॉंग्रेस पर्यावरण विभाग उपाध्यक्ष उत्तम शिंदे ह्यांनी पुष्प अर्पण करून नमन केले. यावेळी सर्वानी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेत सदैव पर्यावरणाची रक्षा करण्याची प्रतिज्ञा केली. दिवाळीत ध्वनी आणि वायू प्रदूषण आटोक्‍यात आणण्यासाठी कार्य करण्याचे निश्चित केले.
यावेळी अशोक काळभोर, दिलीप पांडारकर, आयुष मंगल, उमेश बनसोडे, संदेश नवले, आबा खराडे, आनंद सोंडकर, श्वेता मंगल, राजेश नायर, बजरंग ओहोळ, मिताली चक्रवर्ती, एस टी कांबळे, नाझिया बारस्कर, जयश्री काननाइके उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)