सरदार पटेलांनी भौगिलिक भारत अखंड केला, तर जीएसटीने आर्थिक : नरेंद्र मोदी

केवडिया (गुजरात): भारताचे लोहपुरुष सरदार पटेल यांनी भौगिलिक दृष्टीने भारत अखंड केला, तर जीएसटी (गुडस अँड सर्व्हिस टॅक्‍स) ने आर्थिक दृष्टीने भारत अखंड केला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांचे “स्टॅच्यू ऑफ युनिटी’ लोकार्पण करताना सांगितले. नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवराजवळ, साधु बेटावर उभारलेल्या सरदार पटेल याच्या अतिभव्य पुतळ्याचे त्यांनी आज सकाळी लोकार्पण केले. याची कोनशिला त्यांनीच गुजरातचे मुख्यमंत्री असताना सन 2013 मध्ये बसवली होती. या प्रसंगी गुजरातचे राज्यपाल ओ. पी कोहली, मुख्यमंत्री विजय रुपाणी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

सरदार पटेल हे खरोखर लोहपुरुष होते. भारताला स्वातंत्र्य देताना भारतातील सुमारे 550 संस्थानिकांनाही स्वातंत्र्य देऊन ब्रिटिशांनी भारताचे असंख्य तुकडे तुकडे करण्याचा कुटिल डाव रचला होता. मात्र आपले धैर्य, क्षमता आणि निग्रहीपणाच्या जोरावर सर्व संस्थाने भारतात विलीन करून सरदार पटेलांनी ब्रिटिशांचा तो डाव हाणून पाडला. आणि म्हणून आपल्याला आज अखंड भारत दिसतो आहे. नाही तर गीरचे सिंह पाहण्यासाठी तुम्हाला व्हिसा काढावा लगला असता. सोमनाथाचे दर्शन घेण्यासाठी, हैद्राबादचा चार मीनर पाहण्यासाठी पैसे मोजावे लागले असते; असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले,
या प्रसंगी नरेंद्र मोदी यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला विरोध करणाऱ्या विरोधी नेत्यांचाही समाचार घेतला. एका राष्ट्रपुरुषाचे स्मारक उभारतो म्हणजे जणू काही आम्ही मोठा गुन्हा करत असल्याच्या टीकेची वावटळ त्यांनी उठवली. राष्ट्रपुरुषाचे स्मारक उभारणे हा गुन्हा आहे का? असा प्रश्‍न त्यांनी यावेळी जमलेल्या समुदायाला विचारताच “नाही’ असे गगनभेदी उत्तर जमलेल्या जनतेने एका सुरात दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपले सरकार सरादारांनी दाखवलेल्या मार्गाने वाटचाल करत आहे, असे पंतप्रधानी यावेळी सांगितले.
182 फूट उंचीची स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याच्याही तो दुप्पट उंच आहे.

* सरदार पटेलांच्या पुतळ्याचे अनावरण होत असताना त्यांनी निर्माण केलेल्या संस्था मात्र नष्ट केल्या जात आहेत, हा मोठा दैवदुर्विलास आहे. ही गोष्ट राष्ट्रद्रोहापेक्षा कमी नाही, अशी टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. 

* महात्मा गांधींपेक्षा सरदार पटेलाचा पुतळा उंच का? पटेल हे गांधीचे शिष्य होते. मग गुरूपेक्षा शिष्याचे स्मारक मोठे का? असे प्रश्‍न कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी उपस्थित केले. पटेल हे कॉंग्रेसचे नेते होते आणि भाजपाने त्यांचे अपहरण केले आहे, असा आरोपही थरूर यानी केला. 

* भाजपाने पटेल यांना गुजरातपुरते मर्यादित करून आपल्या संकुचित वृत्तीचे प्रदर्शन केले आहे, असे बसपा सुप्रीमो मायावती यांनी म्हटले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)