‘सरदार पटेलांचा भव्य पुतळा बनू शकतो तर राम मंदिरासाठी अध्यादेश का नाही?’

मुंबई – राम मंदिरावरून राजकारण तापत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारला जाऊ शकतो तर राम मंदिरासाठी अध्यादेश का पारित होऊ शकत नाही, असा सवाल दत्तात्रय होसबळे यांनी केला आहे. रविवारी आयोजित विराट हिंदू सभेमध्ये ते बोलत होते.

दत्तात्रय होसबळे यांनी म्हंटले कि, गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारला जाऊ शकतो तर राम मंदिरासाठी अध्यादेश का पारित होऊ शकत नाही, असा सवाल विचारून ते पुढे म्हणाले, माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिम्हा राव यांनी सर्वोच्च न्यायालयाचे समोर म्हंटले होते कि, पुरातत्व सर्वेक्षण विभागाला त्याठिकाणी मंदिराचे अवशेष मिळाले तर वादग्रस्त जमीन मंदिराला देण्यात येईल. आणि पुरातत्व विभागालाही तेथील जमिनीच्या खोदकामात मंदिराचे अवशेष आढळून आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

-Ads-

दरम्यान,  रामजन्मभूमी बाबरी मशीद या वादग्रस्त प्रकरणाची सुनावणी पुढील वर्षापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता जानेवारी २०१९ मध्येच होणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)