सरदवाडीत विहिरीत आढळला मुलीचा मृतदेह

खेळता-खेळता विहिरीत पडल्याचा प्राथमिक अंदाज

टाकळी हाजी – जांबूत (ता. शिरूर) येथील सरदवाडीत गुरूवारी (दि.24) शेतातील विहिरीत तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला आहे. ईश्‍वरी प्रवीण वाजे (वय 3 वर्षे, रा. सरदवाडी, वाजेमळा, ता. शिरूर) असे मयत मुलीचे नाव आहे. याबात वनविभागाचे वनरक्षक क्षीरसागर यांनी सांगितले की, संबंधित मुलीला बिबट्याने नेले नसून ती खेळता-खेळता विहीरीत पडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्‍त केला जात आहे. तिचा मृतदेह शुक्रवारी (दि.25) विहीरीतून बाहेर काढण्यात आला. तसेच याबाबत कुटुंबाची कोणतीच तक्रार नसल्याचे समजते.

याबाबत मिळालेली माहिती अशी, गुरूवारी (ता. 24) संगीता प्रवीण वाजे या घराशेजारील जांभळाच्या झाडाखाली मुलगी ईश्वरी (वय 3) हिला घेऊन शेतात काम करत होत्या. घरात धोंड्याचा कार्यक्रम असल्याने घरातील मंडळीची लगबग होती. त्यावेळी ईश्वरी कोणाला सापडेना तिच्याजवळ असणारा तांब्या आणि खेळणी अस्थाव्यस्त झाली होती. परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात शोध घेण्यात आला तरी, ती आढळून आली नाही. त्यावेळी शिरूर वनविभागाला या बाबत माहिती देण्यात आली. शिरूरचे वनपरीमंडल अधिकारी एस. एल. गायकवाड आणि वनपाल पी. ए. क्षीरसागर यांनी वनकर्मचाऱ्यांसहीत घटनास्थळी धाव घेतली. गुरूवारी रात्री अकरापर्यंत हा परिसर पिंजून काढला. मात्र, बिबट्याचा कोणताच सुगावा येथे लागला नाही. तसेच ईश्वरी देखील सापडली नाही. दरम्यान, शुक्रवारी (दि.25) पुढील तापस करण्याचे ठरले. त्यानुसार सकाळी आठ वाजल्यापासून वनविभागाने पुन्हा या परिसरातील जवळपास 15 ते 20 एकर ऊसाचे क्षेत्र तपासले. ईश्वरी खेळत असलेल्या झाडापासून शंभर ते सव्वाशे फुट अंतरावर असणाऱ्या विहीरीची तपासणी करण्यात आली. अखेर या विहिरीतून तिचा मृतदेह आढळला असून तो बाहेर काढण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)