सरडे येथे खाजगी सावकारकीचा गुन्हा; तिघांना अटक

फलटण, दि. 28 (प्रतिनिधी) – सरडे, ता. फलटण येथील शेतकऱ्याने खाजगी सावकाराकडून 2 लाख घेऊन त्याबदल्यात 11 लाख रुपये व्याजापोटी देऊनही त्यास आणखी 6 लाखांची मागणी करून जबरदस्तीने मारहाण करत जमिनीचा दस्त करून घेतल्याप्रकरणी त्याच गावातील तिघांवर सावकारकीचा गुन्हा करून अटक केली आहे.
फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरडे येथील संपत नामदेव धायगुडे यांनी 26 ऑक्‍टोबर 2015 रोजी गावातील सुरेश रामचंद्र बरकडे व बाळू रामचंद्र बरकडे यांच्याकडून 2 लाख रुपये 10% व्याजाने घेतले होते. त्यावेळी त्यांनी गट नं 70मधील 32 गुंठे क्षेत्र विहिरीतील हिश्‍यासह मुदत खरेदी खत 4 लाख 30 हजार रक्कम नमूद करून क्षेत्र नावावर करून घेतले होते. या बदल्यात संपत धायगुडे यांनी काही दिवस 20 हजार दरमहा दिले. मात्र, काही हप्ते देणे शक्‍य न झाल्याने बरकडे बंधूनी धमकावून पैशाचा तगादा लावला गट नं 41 मधील धायगुडे यांच्या हिस्स्याची 36 गुंठे जमीन मुदत वाढविण्यासाठी मुदत खरेदीखताने 6 लाख नमूद करून घेतले.
डिसेंबर 2016 ते जून 2017 त्यांचे हप्ते भरल्यानंतर धायगुडे यांनी त्यांचे मालकीची जमीन सोडवून द्या, अशी विनंती केल्यावर जमीन सोडवुन दिली. यावेळी आणखीन 3 लाख येणेबाकी असल्याने गट नं 70 मधील 12 गुंठे जमीन सुरेश रामचंद्र बरकडे, शेखर सुरेश बरकडे, बाळू रामचंद्र बरकडे यांनी शेखर बरकडे यांच्या नावावर करारनाम्याने करून घेतली. त्यानंतरही सतत पैशाची मागणी करून मारहाण करत पैसे वसूल करू लागले. त्यांना व्याजापोटी 11लाख देऊनही आणखी 6 लाख मागितल्याने या छळास कंटाळून संपत धायगुडे यांनी फलटण ग्रामिण पोलीस ठाण्यात सुरेश बरकडे,शेखर बरकडे व बाळू बरकडे या तिघा विरोधात तक्रार दिली. त्यानंतर तिघांनाही पोलिसांनी अटक करण्यात आल्याची माहिती ग्रामिण पोलीस ठाण्याचे रासकर यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)