सरडे गावच्या विकासासाठी कटिबद्ध : दत्ता भोसले

दुधेबावी – सरडे गावात रस्ते वीज पाणी यासारख्या सुविधा उपलब्ध करून देणार असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सरपंच दत्ता भोसले यांनी केले. धायगुडे वस्ती भोसले वस्ती येथे केंद्र सरकारच्या पेयजल योजनेतून सुमारे 18 लाखांच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा टाकीचे भूमिपूजन, याबरोबरच विविध विकासकामांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दत्ता भोसले बोलत होते. अध्यक्षस्थानी विधी व न्याय विभागाचे माजी सचिव विरसिंह पाटील होते.

सरडे शाळा धायगुडे वस्ती येथे पिण्याचे स्वच्छ पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असून वाघमोडे वस्ती येथून पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र पाईपलाईन करून सोनगाव येथील विहिरीचे अतिरिक्त पाणी देणार आहे. थोड्याच दिवसात फिल्टरने शुध्द पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रामदास शेंडगे यांनी स्वागत केले. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लक्ष्मण बेलदार पाटील, विठ्ठल बेलदार, माजी सरपंच कांतीलाल धायगुडे, शंकर बेलदार, शिवाजी जाधव, रघुनाथ येळे, यशवंत धायगुडे, सुनिल भोरे ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)