सरकार १ एप्रिलपासून इलेक्ट्रॉनिक बिल लागू करणार

नवी दिल्ली : एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ५० हजार रुपयांहुन अधिक सामान घेऊन जाण्यासाठी याची आवश्यकता असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक बिलाची योजना येत्या १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे. याविषयीची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क बोर्डने संक्षिप्त जीएसटीआर-3 बी रिटर्न भरण्यासाठी जूनपर्यंतचा वेळ दिला आहे. यापूर्वी कोणत्याही महिन्याचा जीएसटीआर-3 बी रिटर्न पुढच्या महिन्याच्या २० तारखेपर्यंत भरावा लागत होता. वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेने १० मार्चच्या बैठकीत ई वे बिल आणि 3 बी रिटर्न भरण्याची तारीख वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. १ फेब्रुवारीला लागू करण्यात आलेल्या या प्रणालीत अडथळा आल्याने मद्देनजर परिषदेने ई-वे बिल लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर रोखण्यासंदर्भातील हे एक पुढचे पाऊल असल्याचे बोलले जात आहे. यामुळे रोख व्यापारावर लगाम लागेल. जीएसटी निरीक्षकालाही ई वे बिल सादर करण्यात येणार आहे. 50,000 रुपयांहुन अधिक मालाच्या ट्रान्सपोर्टवर ई-वे बिल लावण्यात येईल. यासोबतच सरकारने व्यापाऱ्यांसाठी संक्षिप्त विक्री रिटर्न जीएसटीआर- 3बी आणि अंतिम विक्री रिटर्न जीएसटीआर-1 जूनपर्यंत भरण्याची अनुमती दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)