सरकार मीच चालवणार – कुमारस्वामी

बंगळूरू – कुमारस्वामी यांच्या कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला देशातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी काल हजेरी लावल्यामुळे काल प्रसारमाध्यमांत कुमारस्वामी यांचाच बोलबाला होता. मात्र आज कामकाजाच्या पहिल्या दिवशी त्यांना काही गोष्टींचाही खुलासा करावा लागला आहे. त्यातील मुख्य बाब म्हणजे कुमारस्वामी केवळ चेहरा आहेत. पडद्यामागून त्यांचे पिता व माजी पंतप्रधान देवेगौडाच राज्यसरकार चालवणार असल्याची कुजबुज सुरू झाली आहे. त्याचा आज कुमार यांनी इन्कार केला असून आपणच सरकार चालवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या पूर्वसंध्येला देवेगौडा यांनी राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती व राज्याची आर्थिक व अन्य स्थिती त्यांच्याकडून जाणून घेतली होती. त्या पार्श्‍वभूमीवर कुमारस्वामी जरी मुख्यमंत्री असले तरी सरकार देवेगौडाच चालवणार का, अशा चर्चा सुरू झाल्या. पण आपले काम आपणच करणार असून त्यात कोणी हस्तक्षेप करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझे वडील ज्येष्ठ राजकीय नेता असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा जरूर फायदा करून घेतला जाईल. मात्र प्रशासनात त्यांचा हस्तक्षेप नसेल. मी जनतेत राहणारा मुख्यमंत्री जनतेची नाडी आपल्याला समजते, असा दावाही त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)