सरकार, बॅंका, विमा कंपन्यांतील संवेदनशील पदे फिरती ठेवा

केंद्रीय दक्षता आयोगाची सुचना
नवी दिल्ली – केंद्र सरकारचे विविध विभाग, सर्व बॅंका आणि विमा कंपन्यांमधील संवेदनशील पदांवरील अधिकाऱ्यांच्या जागा सतत फिरत्या ठेवा अशी सुचना दक्षता आयोगाने केंद्र सरकारला केली आले. या पदांवरील माणसे सतत बदलती ठेवली तर तेथील भ्रष्टाचाराला आळा बसू शकेल असे या आयोगाचे मत आहे. ही माणसे बदलती न ठेवल्यामुळेच सध्याचे मोठे घोटाळे झाले असल्याचेही दक्षता आयोगाने म्हटले आहे.

कोणत्याही पदावरील अधिकारी त्या पदावर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ राहता कामा नये तीन वर्षाच्या आत त्याची तेथून बदली करण्याचा आदेश या आधीही देण्यात आला होता पण त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही. आता या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षाही आयोगाने व्यक्‍त केली आहे. अधिकाऱ्याचे प्रत्येक वेळी स्टेशनच बदलले पाहिजे असे नाही तर त्याच्या पदात बदली केली तरी ते उपयोगी ठरेल असे आयोगाचे म्हणणे आहे.

बॅंकांमध्ये संवेदनशील पदांवर तेच ते अधिकारी वर्षानुवर्ष त्याच पदावर कायम राहिल्यानेच अलिकडच्या काळात अनेक मोठे बॅंक घोटाळे घडले आहेत. हा आधिकाऱ्यांची त्यांच्या पदांवरून बदली न केल्याचाच परिणाम आहे असे सीव्हीसीचे म्हणणे आहे. आम्ही केलेल्या या सुचनेवर काय अंमलबजावणी केली याचा अहवाल पाठवण्याची सूचनाही दक्षता आयोगाने केंद्र सरकारला केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)