सरकार पाडण्याचे प्रयत्न हाणून पाडू – कुमार स्वामी

भाजपने सुरू केली आहे तयारी
बंगळुरू – भारतीय जनता पक्षाने जेडीएसच्या काही आमदारांना पैसे देऊन फोडण्याची तयारी सुरू केली असून कॉंग्रेस मधील असंतोषाचाही लाभ घेऊन सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आमदारांसाठी रिसॉर्ट बुकींगही केले जात असल्याच्या बातम्या आहेत. पण तसले कोणतेच प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. वेळ प्रसंगी अशा लोकांच्या विरोधात कायदेशीर कारवाईही करण्यास आम्ही मागेपुढे पहाणार नाही असा सज्जड इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिला आहे.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी या संबंधात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांकडे पत्रकारांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की त्यांनी कितीही रिसॉर्ट तयार ठेवली तरी आम्हीही त्यांच्या विरोधात योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करू पण आमचे सरकार पाडण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत. कोणत्याही आव्हानात्मक स्थितीचा सामना करण्यास आम्ही तयार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. सध्याच्या स्थितीत काही आमदारांना आगाऊ पैसे दिले जात असल्याची आपली माहिती आहे पण त्यापेक्षा आपण सध्या काही बोलणार नाहीं असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपने आपले सरकार पाडण्यासाठी सोमवार पर्यंतची तारीख निश्‍चीत केली असल्याचे सांगितले जाते. पण नंतर ते स्वत:हूनच ही समय सीमा बदलतील आणि ती दसऱ्यापर्यंत वाढवतील. त्यानंतरही त्यांना ही मर्यादा सतत वाढवावी लागेल असेही ते म्हणाले. आपल्या पक्षातील कोणताही आमदार त्यांच्या गळाला लागणार नाही असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)