सरकार परवानगी देईल तेथे दसरा मेळावा

पाथर्डी – श्रीक्षेत्र भगवानगड येथील दसरा मेळावा शासन परवानगी देईल त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पंकजा मुंडेयांना मेळाव्याचेनिमंत्रण देण्यासाठी लवकरच कार्यकर्ते मुंबईला जाणार असल्याचे पंचायत समिती माजी सभापती संभाजी पालवेयांनी सांगितले. भगवान गडाचेमहंत नामदेव शास्त्री यांनाही मेळाव्याचेनिमंत्रण देण्यात येणार आहे.

येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी आयोजीत बैठकीला नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे, नबाब शेख, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण , गोकुळ दौंड, राम लाड, रणजित बेळगे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, सहदेव शिरसाठ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन पालवे, बाबासाहेब ढाकणे, अर्जुन धायतडक, नगरसेवक प्रसाद आव्हाड , भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष नागनाथ गर्जे, महादेव दहिफळे, नितीन कीर्तने, बाजीराव गितेयावेळी उपस्थित होते.
भाजपचेतालुकाध्यक्ष माणिक खेडकर , दैत्यनांदूरचे सरपंच संजय दहिफळेआदींनी कार्यकर्त्याशी संपर्क केला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना येत्या तीन तारखेला औरंगाबाद येथील कार्यकर्त्यांनी बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. त्यानंतर पाथर्डी तालुक्‍यातील कार्यकर्ते मुंडे यांना निमंत्रण देण्यासाठी जाणार आहेत. दसरा मेळाव्यासंदर्भात ते मार्गदर्शन घेणार आहेत.

दर आठवड्याला मेळाव्याबाबत नियोजनाची बैठक होणार आहे. यावेळी झालेल्या चर्चेत मुंडे व महंतांमधील मतभेद आता संपतील, असा विश्‍वास व्यक्‍त केला. गडाचे महंत डॉ.नामदेव शास्त्री यांनी गडावर राजकीय नेते, पक्षीय नेतेआदींना गडावर भाषण बंदी करावी अशी मागणी केली होती. त्याची कठोर अंमलबजावणी झाल्याने पंकजा मुंडे समर्थकांनी विविध मार्गांनी संताप व्यक्‍त करत महंतांच्या निर्णयाविरूध्द नाराजी व्यक्‍त केली होती. गडाचे महंत निर्णयावर ठाम राहिल्यानेमागील वर्षापासून दसरा मेळावा गडाच्या पायथ्याला आयोजित करून गड विरूद्ध पंकजा मुंडे असा वाद संपवण्याचा निर्णय तालुक्‍यातील मुंडे समर्थकांनी घेतला. यावर्षी वाद न होता दसरा मेळावा शांततेत पार पडेल, असा विश्‍वास कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)