सरकार धाडसाने निर्णय घेते; निर्धाराने अंमलबजावणी करते – पंतप्रधान

मागील यूपीए राजवटीची उडवली खिल्ली

उदयपूर -आमचे सरकार धाडसाने निर्णय घेते आणि निर्धाराने त्यांची अंमलबजावणी करते, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील मागील यूपीए सरकारची खिल्ली उडवली.

केंद्रातील आमच्या सरकारने सुत्रे स्वीकारली तेव्हा संपूर्ण व्यवस्था पांगळ्या अवस्थेत होती. कुणी दुबळा असता तर अशा स्थितीत खचून गेला असता. मात्र, आम्ही वेगळ्या मातीचे बनलो आहोत. आम्ही आव्हाने स्वीकारतो, त्यावर तोडगा काढतो आणि विकासमार्गावर वाटचाल करतो, अशी भूमिका मोदींनी राजस्थानच्या खेलगांवमध्ये झालेल्या सभेत बोलताना मांडली. तब्बल 15 हजार कोटी रूपयांच्या महामार्ग प्रकल्पांच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.

रस्त्यांच्या जाळ्याचा विस्तार झाल्यानंतर कृषी, पर्यटन, औद्योगिक क्षेत्रांत विकासाचे मार्ग खुले होतात. फुल विक्रेत्यापासून ते चहा विक्रेत्यापर्यंत सर्वांनाच चांगले उत्पन्न मिळते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. निवडणुकांवेळी मोठमोठी आश्‍वासने देऊन विविध घोषणा करणे ही परंपरा बनून गेली आहे. अनेक वर्षांपासून ती चालू आहे. मात्र, आमच्या सरकारने विकासकामांची गती वाढवली आहे. आमचे सरकार राजकारण नव्हे तर विकास करते, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)