सरकार जर स्वच्छ अन् पारदर्शी आहे तर जेपीसीला का घाबरता ? – शिवसेना

नवी दिल्ली: राफेल करारावरून शिवसेनेने देखील संशय व्यक्त केला आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी  ‘सरकार जर स्वच्छ अन् पारदर्शी असेल तर आपण जेपीसीला का घाबरतो ?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.

अरविंद सावंत म्हणाले, जेटलींच्या उत्तराने आपलं समाधान झालं नसून सरकार जर स्वच्छ अन् पारदर्शी असेल तर आपण जेपीसीला का घाबरतो ? तसेच, ज्याची कुठलिही कंपनी नव्हती असा कसला ऑफसेट कॉन्ट्रॅक्टर होता ? केवळ कागदोपत्रीच कंपनी होती का ?. याउलट एचएएलकडे सर्वच असतानाही एचएएलला काँट्रॅक्ट का दिलं नाही, असाही प्रश्न सावंत यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. लोकसभेमध्ये बोलताना आज राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये राफेलबाबत लोकसभेमध्ये येऊन चर्चा करण्याचे धाडस नसल्यामुळे ते आपल्या खोलीमध्ये लपून बसनेच जास्त पसंत करतात.”

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची राफेलबाबतची एक ऑडिओ क्लिप लोकसभेमध्ये सादर करण्याची परवानगी मागितल्याने सभागृहामध्ये एकाच गोंधळ उडाला.

राहुल गांधींच्या या मागणीवर बोलताना केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी जोरदार आक्षेप नोंदविताना, “सदर ध्वनी फित ही नकली असून कोणीतरी राजकीय हेतूने ती बनवली आहे. या ध्वनीफितीच्या सत्यतेबाबत राहुल गांधी प्रमाण देऊ शकतात काय? ही ध्वनीफीत नकली निघाल्यास राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यपद देखील काढून घेतली जाऊ शकते, याचा तरी त्यांना अंदाज आहे काय?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढविला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)