सरकार एअर इंडियाला मदत करणार 

File photo
नवी दिल्ली: एअर इंडियाला अर्थसाह्य देण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार सुरू आहे असे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले. मात्र किती अर्थसाह्य केले जाणार, हे स्पष्ट झालेले नाही. एअर इंडियाच्या खासगीकरणाचा याआधी प्रस्ताव होता. पण त्याला प्रतिसादच न मिळाल्याने आता पुन्हा अर्थसाह्याचा विचार सुरू आहे. एअर इंडियाच्या डोक्‍यावर 48 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.
त्यातच अलीकडील काळात सातत्याने होत असणारी रुपयाची घसरण आणि इंधनाचे वाढते दर यांमुळे या विमान कंपनीचा तोटा वाढत चालला आहे. इंडियन एअरलाइन्सचे एअर इंडियामध्ये 2007 साली विलीनीकरण केल्यापासून हा तोटा वाढतच चालला आहे. सततचा तोटा आणि खासगीकरणाच्या प्रस्तावाला मिळू न शकलेला प्रस्ताव यांमुळेच एअर इंडियाला आणखी अर्थसाह्य करण्याशिवाय केंद्राला पर्यायच शिल्लक राहिलेला नाही. एअर इंडियाने 2100 कोटी रुपये देण्याची विनंती केंद्र सरकारला केली असल्याचे सांगण्यात येते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)