सरकार उलथवून टाकण्यास जनतेने साथ द्यावी

खासदार अशोक चव्हाण : हडपसर विधानसभा मतदार संघ कॉंग्रेसतर्फे जनसंघर्ष यात्रा

हडपसर – अच्छे दिनचे स्वप्न दाखवून खोटे बोल, पण रेटून बोलत सत्तेवर आलेल्या भाजपने चार वर्षे फसवे राजकारण केले. शेती, सहकार, साखर कारखानदारी संपविण्याचा प्रयत्न केला. सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता संस्कृती स्वीकारत ते मस्तवाल झाले आहेत. सैनिकांच्या कुटुंबाबद्दल अपशब्द काढणे, महिलांवर अत्याचार करणे आणि आतातर आपल्या भगिनींना पळवून नेण्याची भाषा करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे राज्यात दारिद्रय निर्माण करणारे हे भाजप सरकार उलथवून टाकण्यास सामान्य जाणतेने साथ द्यावी, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले.

हडपसर विधानसभा मतदार संघ कॉंग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानित्ताने येथील कन्यादान मंगल कार्यालयात आयोजित समारोप सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार शरद रणपिसे, संजय बालगुडे, माजी नगरसेविका कविता शिवरकर, विजया वाडकर, पार्वती भडके, अमित घुले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मोदी सरकारने घेतलेले सर्वंच निर्णय फसले आहेत. सर्व सामान्य माणसाला त्यांनी वेठीस धरले आहे. भाजप सरकारने सामान्यांचे जगणे महाग करून टाकले आहे. आज अनेक प्रश्न समोर आहेत. महागाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अधोगतीला नेला आहे. सुशिक्षित बेरोजगारांचे कोणतेही प्रश्न सुटलेले नाहीत. म्हणूनच आम्ही महाआघाडी करून आता जनतेच्या समोर जात आहोत. या महायज्ञात सर्वांनी साथ द्यावी. कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा ही महाराष्ट्राच्या हितासाठी व जनतेच्या हक्कासाठी आहे.

भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध महिला कॉंग्रेच्या अध्यक्षा विजया वाडकर यांनी केला. प्रास्ताविक हडपसर ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष प्रशांत तुपे यांनी केले. सूत्रसंचालन सन्मित्र बॅंकेचे संचालक गणेश फुलारे यांनी केले तर, माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी आभार मानले.

पुन्हा जाहीर सभा घ्या

माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर म्हणाले की, शहर आणि हडपसर विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसची विचारसरणी आणि तिरंगा झेंडा मजबूत करण्याचे काम कार्यकर्ते करीत आहेत, हे कौतुकास्पद आहे. राज्यात जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून कॉंग्रेस जनतेशी संपर्क व संवाद करीत आहे. याला खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून राज्यातील सध्याच्या सरकार विरोधातील जनतेचा आक्रोश यातून दिसत आहे. दरम्यान हडपसर मतदार संघात पुन्हा एकदा मोठी जाहीर सभा घेण्याची मागणी यावेळी शिवरकर यांनी केली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)