सरकार आमचे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करत आहे- अण्णा हजारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली: आजपासून दिल्लीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. परंतु, आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वीच अण्णा हजारेंनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. सरकार आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करत आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या बस, रेल्वे सरकारने रोखल्या आहेत. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये असे होता कामा नये असेही ते म्हणाले आहेत.

आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे.  दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातून अण्णा राजघाटाकडे कूच केली आहे. राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन करणार आहेत. अण्णा हजारे रामलीला मैदानावर धरणे आंदोलन करणार असून, अण्णांच्या या आंदोलनाला काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. मोदी सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोपही अण्णा हजारे यांनी यावेळी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)