सरकार आणणार आता ७५ रुपयांचे नाणे 

नवी दिल्ली – तुमच्या हातात लवकरच ७५ रुपयांचे नाणे येणार आहे. ३० डिसेंबर १९४३ रोजी अंदमान निकोबारची राजधानी पोर्टब्लेयरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकावला होता. या घटनेला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने केंद्र सरकार ७५ रुपयांचे ‘स्मारक नाणे’ म्हणजेच ‘कोमेमोरेटिव कॉइन’ जारी करण्याची घोषणा केली आहे. यासंबंधी वित्त मंत्रालयाने एक सूचनाही जारी केली आहे.

७५ रुपयांच्या  कोमेमोरेटिव कॉइनची वैशिष्ट्ये –  

-Ads-

– या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम असेल
– यामध्ये ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे आणि ५-५ टक्के निकेल व जिंक धातू असेल.
– या नाण्यावर सेल्युलर जेलच्या मागे तिरंग्याला सलामी देताना नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे चित्र असेल.
– चित्राच्या खाली ७५ अंक लिहलेला असेल. याचा अर्थ ७५ वा वर्धापन दिन असा असेल.
– नाण्यावर देवनागरी आणि इंग्रजी शब्दांमध्ये ‘प्रथम ध्वजारोहण दिवस’ लिहलेले असेल.

दरम्यान, याआधीही सरकरने तामिळनाडूचे पूर्व मुख्यमंत्री आणि सुपरस्टार डॉ. एमजी रामचंद्रन यांच्या १०० व्या जन्मशताब्दी निमित्ताने १०० रुपयांचे नाणे जारी केले होते.

What is your reaction?
2 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)