सरकार आंधळं, बहिरं आणि मुकं – बाळा नांदगावकर

कोल्हापूर -सामान्यांच्या  प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे हे सरकार आंधळ , बहिर आणि मूकं असल्याची टीका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलीय. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. आगामी लोकसभा आणि विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या मजबूत बांधणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर हे 2 दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर  आले होते.यावेळी दोन्ही नेत्यांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांनी  गटतट विसरून पक्षाच्या मजबूत बांधणीसाठी एकत्र येण्याची सूचना देखील यावेळी  नांदगावकर यांनी बैठकीत केली. पक्षाच्या नियमाच पालन न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना  घराचा रस्ता दखवला जाईल असा इशारा देखील नांदगावकर यांनी दिला. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर यांनी सरकारवर टीका केली.   तसंच सामान्यांच्या  प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे हे सरकार आंधळ, बहिर आणि मुकं असल्याची टीका नांदगावकर यांनी केलीय.

भाजपा नेते माधव भंडारी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना नांदगावकर यांनी माधव भंडारींनी स्वतःची उंची आधी पहावी असं म्हणत.उंची नसणाऱ्यांनी दुसऱ्यावर टीका करू नये असं सल्ला देखील त्यांनी दिलाय. कोल्हापूरमधून सुरू झालेला दौरा राज्यभर सुरू राहणार आहे. या दौऱ्याचा अहवाल मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांना देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)