सरकारी वकिलाचा न्यायाधीशावर हल्ला

नागपुर – येथील कोर्टाच्या आवारात सहायक सरकारी वकिलाने न्यायाधीशावर हल्ला करण्याचा प्रकार आज घडला. जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर हा प्रकार घडला. या प्रकरणी वरीष्ठ दिवाणी न्यायाधिश के. आर. देशपांडे यांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सहायक सरकारी वकील डी. एम. पराटे यांनी आपल्या थोबाडीत मारल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी दिलेल्या एका निर्णयामुळे ते संतापले होते त्यातून त्यांनी हा प्रकार केल्याचे सांगण्यात येते. जिल्हा सरकारी वकिल नितीन तेलगोटे यांनी या प्रकराचा निषेध केला आहे. वकिलाने असे कृत्य करणे हे समाजाला कदापिही मान्य होणार नाही. त्यांना न्यायाधीशांविषयी काही तक्रार असेल तर ती त्यांनी योग्य त्या मार्गाने उपस्थित करायला हवी होती त्यांच्याकडून असा प्रकार होणे ही गंभीर बाब आहे असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी अद्याप संबंधीत सहायक सरकारी वकिलाला अटक करण्यात आलेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)