सरकारी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापित करण्याची मागणी

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सरकारी रुग्णालयांची परिस्थिती 21 दिवसांत सुधारण्यात यावी. रुग्णालयांमध्ये नागरिकांची पिळवणूक होत असल्याने मनपा आयुक्‍तांनी स्वतः लक्ष घालून समन्वय साधण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापित करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. 21 दिवसात परिस्थिती न सुधारल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात येईल.

शिवसेना रहाटणी, काळेवाडी विभाग व शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये युवराज दाखले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारी रुग्णालयांची अवस्था अत्यंत बिकट असून नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून स्वतंत्र समिती असणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने नगरसेवक, सामाजिक क्षेत्र व वैद्यकीय क्षेञातील आवड असणाऱ्या बारा जनांची निवड करण्यात येईल. ही समिती रुग्णालय कर्मचारी, रुग्णाचे नातेवाईक व प्रशासन यांच्यात समन्वय साधून रुग्णांची हेळसांड रोखली जाऊ शकेल. रुग्णालयांची परिस्थिती 21 दिवसांमध्ये न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात येईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)