नवी दिल्ली-गेल्या आर्थिक वर्षात सार्वजनिक बॅंकांनी 64,106 कोटी रुपयांच्या अनुत्पादित कर्जाची वसुली केली आहे. यामुळे बॅंकांतील बुडीत कर्जात काही प्रमाणात कमी येण्यास मदत झाली. मात्र, या बॅंकांतील एकूण बुडीत कर्जाच्या तुलनेत हा आकडा कमीच आहे. मार्चअखेरीस सरकारी बॅंकांचे एकूण बुडीत कर्ज 8,95,601 कोटी रुपयांचे होते. चंद्रशेखर गौड यांनी आरबीआयकडे माहिती अधिकारानुसार मागितलेल्या माहितीनुसार, 2015-16 मध्ये 40,903 कोटी रुपये आणि 2016-17 मध्ये 53,250 कोटी रुपयांची बुडीत कर्जाची वसुली करण्यात आली होती.
या दोन्ही आर्थिक वर्षातील एकूण अनुत्पादित कर्जाची संख्या 5,39,968 आणि 6,84,732 कोटी रुपये होती. मात्र, आरबीआयकडून बॅंकेनुसार कर्जाचा हिस्सा किती आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही. एसबीआयकडे सर्वाधिक बुडीत कर्ज असल्याचे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)