सरकारी बँक कर्मचाऱ्यांचा उद्यापासून संप

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली : बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात केवळ दोन टक्क्यांची वाढ केल्याच्या निषेधार्थ देशभरातील बँकांचे कर्मचारी येत्या ३० मे पासून दोन दिवसांच्या संपावर जाणार असल्याचे सोमवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. बँक कर्मचाऱ्यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी आणि संप होऊ नये यासाठी मुख्य कामगार आयुक्तांनी कर्मचारी आणि ‘इंडियन बँक्स असोशिएशन’च्या सदस्यांसमवेत बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या वेतनात केवळ दोन टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ‘आयबीए’ने पुढे रेटल्यामुळे कर्मचारी संतापले आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’ (यूएफबीयू) दोन दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)