आपल्या समाजामध्ये संस्कृतीमध्ये लग्न हा एक संस्कार मानला जातो. पूर्वीच्या काळी माणसांच्या विचारांना शब्दांना विश्‍वासाला मानणारी माणसं असायची; परंतु आज जशी पाण्याची पातळी कमी व्हायला लागली तशीच माणुसकीचीही पातळी खालावताना दिसते आहे. परिसरात लग्नाची सोयरीक जुळवत असताना मुलांना सरकारी नोकरी आहे का, हे पाहिलं जातं. परंतु जर एखाद्या सरकारी नोकरी असलेला पाहुणचार हवा असेल आणि नातं बरोबरीचं करायचं असेल तर पहिल्यांदा मुलीच्याही घरात सरकारी नोकरदार असणारा वारसा असावा किंवा कुटुंबातील माणसं सरकारी नोकरीत असतील तर सरकारी जावई मिळविण्यासाठीची असणारी व सरकारी नोकरीची अट लक्षात घेता येऊ शकते. दुसरीकडे सरकारी नोकरीची इतरांकङून अपेक्षा करत असताना आपण आपल्या मुलीला किती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला, किती सरकारी परीक्षा दिल्या, तिची बुद्धीची पात्रता, शैक्षणिक पात्रता किती याचा पण विचार व्हायला हवा.

एका बाजूला सरकारी नोकरी असणारा जावई हवा म्हणायचं आणि दुसरीकडे ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस कॉंस्टेबल, पोस्टमन, न्यायालयात शिपाई अशा सरकारी नोकरदारांना डावललं जातं. म्हणजे सरकारी नोकरीची संकल्पना आणि त्याची व्याख्या नीट समजून घ्यायला हवी. दरवर्षी निघणाऱ्या जेमतेम बोटावर मोजण्याइतक्‍या सरकारी जागांमधून निघणाऱ्या जातीचं आरक्षण; आणि या आरक्षणातून जातीला फायदा किती? त्यातूनही स्पर्धा याचाही विचार सुज्ञ पालकांनी करायला हवा. पालकांना सरकारीच जावई हवा, हे दुर्दैवाने म्हणावं लागेल…
– किरण धुमाळ, अकलूज 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)