सरकारी तिजोरीतून विनायक मेटे यांच्यासाठी तब्बल २० लाखांची कार

मुंबई:  राज्यात एकीकडे सरकारी तिजोरीवर कर्जाचा डोंगर असल्याचे नेहमीच सांगण्यात येते. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या सेवेला तब्बल २० लाखांची कार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे ही कार सरकारी खर्चातून उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानेदेखील मंजुरी दिली आहे. तसेच यासांदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचेही म्हटले जात आहे.

अर्थ विभागाकडून या महागड्या कार खरेदीला नकार देण्यात आला असला तरी हा विरोध डावलून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यास सांगितले असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वी विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत, दिल्लीत परिषद घेणार असल्याचा इशारा दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)