सरकारी कार्यालातील वीज बचतीसाठी शासनाचा ‘स्पर्श’ उपक्रम

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यातील शासकीय इमारतींमधील जुनी विद्युत उपकरणे बदलून ऊर्जा सक्षम उपकरणे बसविण्यासाठी ‘स्पर्श’हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ऊर्जा कार्यक्षम उपकरणे बसविल्यामुळे राज्य शासनाच्या इमारतीमधील विजेच्या वापरामध्ये बचत होणार असून वर्षाकाठी सुमारे १२० दशलक्ष युनिट्स विजेची बचत होणार असून वीज देयकामध्येही ११४ कोटी रुपयांची बचत होणार आहे, असा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, या उपक्रमातून नागपूर राजभवन, विधानभवन, रवी भवन, आमदार निवास, हैद्राबाद हाऊस, पुणे- राजभवन, सेंट्रल बिल्डिंग, जिल्हा रुग्णालय, सोलापूर- शासकीय सर्वोपचार रुग्णालय, मुलुंड विमा रुग्णालय, मुंबई- बांधकाम भवन, जीटी हॉस्पिटल, ठाणे जिल्हाधिकारी कार्यलय, कोल्हापूर- सीपीआर रुग्णालय,मध्यवर्ती प्रशासकीय भवन आणि औरंगाबाद- उच्च न्यायालय खंडपीठ या इमारतीमध्य ऊर्जा कार्यक्षम पंखे, दिवे, वातानुकुलित यंत्रे बसविण्यात आली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)