सरकारी कामात अडथळा : सराईत गुंड तडीपार

पुणे – सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला तडीपार करण्यात आले आहे. संग्राम सुधाकर घंगाळ (50, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे तडीपार गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात मारामारी करणे, नागरिकांना हत्याराचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करण असे गुन्हे दाखल आहेत.

त्याच्याविरूद्ध खडक पोलिसांनी वेळोवेळी कारवाई केली होती. मात्र, त्याच्या वर्तवणुकीत काहीच फरक पडला नाही. तो लोकांच्या कुरापती काढुन मारहाण करून गुन्हे करत होता. त्याने परिसरात मोठी दहशत निर्माण केल्याने, त्याच्याविरूद्ध तक्रार देण्यास कोणीच पुढे येत नव्हते. यामुळे त्याला शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस ठाण्याकडून पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांच्याकडे पाठविण्यात आला होता.

-Ads-

त्यानुसार हा प्रस्ताव मान्य करून त्याला 30 जुलै रोजी पुणे शहर व जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड, वैभव पवार, पोलीस कर्मचारी महेश बारवकर, महेश कांबळे, दिपक मोघे यांनी कारवाईमध्ये भाग घेऊन प्रस्ताव तयार केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)