सरकारी कर्मचा-यांच्या संपाची कोंडी कायम

मुख्य सचिवांची चर्चा निष्फळ
मुंबई – सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तसेच इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपाची कोंडी बुधवारी दुस-या दिवशीही कायम होती. मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. मात्र, चर्चेतून कोणताही तोडगा न निघाल्याने आज (गुरूवार) तिस-या दिवसाच्या संपावर कर्मचारी ठाम आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट असण्याची शक्‍यता आहे.

राज्यभरातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी कालपासून संपात उतरल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे. संपात मंत्रालयातील कर्मचा-यांसह जीएसटी, लेखा अभिधान, आरटीओ, सरकारी रूग्णालये, शिधावाटप कार्यालये, जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालय तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपाचा सर्वसामान्यांना त्रास होत असल्याने सरकारकडून आज संप मिटविण्याचे प्रयत्न झाले. मात्र, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने सरकारचे प्रयत्न निष्फळ ठरले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुस-या दिवशी संप मिटावा म्हणून मुख्य सचिवांनी आज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी ही चर्चा समाधानकारक झाली नसल्याचे सांगितले. सरकारने महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत शासन आदेश जारी केला आहे. मात्र कर्मचा-यांना जानेवारी 2017 आणि जुलै 2017 नंतरच्या एकूण 14 महिन्यांची थकबाकी मिणणार आहे. जानेवारी 2018 पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी एकत्र मिळावी, अशी आमची मूळ मागणी होती. आता जानेवारीनंतरची थकबाकी दिवाळीच्या दरम्यान द्या, अशी मागणी सरकारकडे करण्यात आल्याचे दौंड यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी 4 आँगस्टला जे निवेदन केले त्यात जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचे म्हटले आहे. परंतु, नोव्हेंबरपासून वेतन आयोग लागू करावा या मागणीवर आम्ही ठाम आहोत. मुख्यमंत्र्यांनी वेतन आयोगाची अंतरिम अंमलबजावणी करण्याचे सांगून वेतन आयोगाच्या शिफारशीतील 50 टक्के भाग देऊ केला आहे. त्यामुळे कर्मचा-यांना आयोगाच्या शिफारशीप्रमाणे बेसिक आणि भत्त्यात वाढ होणार नाही, असे दौंड यांनी सांगितले. सरकारने सातव्या वेतन आयोगासाठी जानेवारी 2017 मध्ये बक्षी समिती नेमली. दीड वर्ष उलटूनही समितीचा अहवाल आलेला नाही. आता सरकारने सप्टेंबरपर्यंत अहवाल मागवून जानेवारीत नव्या वेतन संरचनेप्रमाणे वेतन द्यावे, अशी आमची मागणी असल्याचे दौंड म्हणाले.

रूग्णालय कर्मचा-यांना कामावर रूजू होण्याच्या सूचना
दरम्यान, रूगणालयातील कर्मचार्यांना कामावर रूजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत बीपीसीएलच्या रिफायनरीला आग लागून अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना लक्षात घेऊन रूग्णांची अडवणूक होऊ नये म्हणून रूग्णालय कर्मचारी कामावर परततील, असे अविनाश दौंड यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)