सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार कॅशलेस वैद्यकीय उपचार

मुंबई – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकिय उपचार मिळावे तसेच आजारांच्या यादीत नवीन आजारांचा समावेश केला जावा, यासाठी आरोग्य सेवा सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती तीन महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे.

पोलिसांना कॅशलेस वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध असली तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अजूनही कॅंशलेस वैद्यकीय उपचार मिळत नसल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. वैद्यकीय उपचारांचा खर्च केल्यावर वीमा कंपन्यांकडून या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्तता करावी लागते. राज्य सकारी कर्मचाऱ्यांना एक लाख रुपयांपासून वीस लाख रुपयांपर्यंत वीमा कवच आहे. पण वीम्याच्या या रक्कमेच्या हप्त्याची रक्कम फारच मोठी आहे. राज्य सरकारी कर्मचारी व त्याच्या पत्नीला वीमा कवच आहे. पण अपत्यांना वीमा योजना लागू नाही. या वीमा योजनेची व्याप्ती वाढवण्याची सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

-Ads-

सरकारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या संदर्भात आरोग्य विभागाने आरोग्य सेवा सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचा-यांच्या वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती विनाविलंब होण्यापासून शासकीय कर्मचा-यांना कॅशलेस सेवा लागू करण्याबाबत उपाययोजना सुचवण्याची जबाबदारी या समितीवर टाकण्यात आली आहे. त्याशिवाय आजारांच्या यादीमध्ये नवीन आजारांचा समावेश करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)