सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या 26 हजार तक्रारी

नवी दिल्ली – सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात गेल्या वर्षी 26 हजार तक्रारी दाखल झाल्याची माहिती सरकारतर्फे आज लोकसभेत देण्यात आली. हा आकडा फक्त दक्षता आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचा आहे.

सन 2017 या वर्षात दाखल झालेल्या या तक्रारींची संख्या26052 इतकी आहे अशी माहिती कार्मिक विभागाचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. ते म्हणाले की यापैकी 22 हजार 386 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. सन 2015 मध्ये दक्षता आयोगाकडे अशा प्रकारच्या 32149 आणि सन 2016 मध्ये 51207 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या अशी माहितीही मंत्र्यांनी दिली.

उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांच्या विरोधात किती प्रकरणे दाखल झाली आहेत याची नोंद सरकारकडे नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)