सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात…

नऊ महिन्याचा महागाई भत्ता रोखीने 

मुंबई – सरकारी कर्मचाऱ्यांची यंदा दिवाळी जोरात आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2018 या 9 महिन्याच्या कालावधीची 3 टक्के महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम ऑक्‍टोबरच्या पगारात रोखीने देण्यात येणार आहे. वित्त विभागाला तसे आदेश देण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 1 जानेवारी 2018 पासून 139 वरून 142 इतका करण्यात आला होता. तसेच ऑक्‍टोबर 2018 च्या वेतनात या महागाई भत्त्याची रक्कम रोखीने देण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. 9 महिन्याच्या थकबाकीचा निर्णय प्रलंबित होता. या बाबतचा शासन निर्णय 29 ऑक्‍टोबर रोजी वित्त विभागाने काढल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

सरकारी कर्मचारी संघटनांची निदर्शने
महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्‍कम मिळणार असली तरी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने मंत्रालयात मंगळवारी निदर्शने करण्यात येणार आहेत. अंशदायी पेन्शन योजनेबाबत त्वरित समिती नेमावी, सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या बक्षी समितीचा अहवाल तात्काळ प्राप्त करावा, चतुर्थश्रेणी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्नाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करावे या मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)