सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी…

मंत्रालयात केवळ 22 टक्के अधिकाऱ्यांची उपस्थिती


संप सुरूच राहणार

मुंबई – सरकारी कार्यालयातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी राज्यभर पुकारलेला संप यशस्वी झाल्याचा दावा बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने केला आहे. या संपात मंत्रालयातील सर्वच विभागातील कर्मचारी संपात उतरल्याने दुपारपर्यंत केवळ 22.43 टक्के अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मंत्रालयासह आरटीओ, जीएसटी कार्यालये, लेखा, मुद्रांक शुल्क, रूग्णालये, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयांमधील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने नागरिकांची अनेक कामे खोळंबल्याचे चित्र दिसत होते.
राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी 7, 8 व 9 ऑगस्टपर्यंत संप पुकारला आहे.

-Ads-

संपाच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून सरकारी कार्यालये ओस पडली होती. आज मंत्रिमंडळाची बैठक असतानाही दुपारपर्यंत मंत्रालयातील सर्वच कार्यालयात शुकशुकाट पसरला होता. या संपामुळे मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथिगृहात घेण्यात आली. चतुर्थ श्रेणी कर्मचारी या संपात उतरल्याने सकाळी मंत्रालयातील कार्यालयेही उघडली गेली नव्हती. त्यामुळे अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर ताटकळत उभे राहावे लागले होते. मंत्रालयात दुपारी 12 वाजेपर्यंत केवळ 2,043 कर्मचारी म्हणजेच 22.43 टक्के उपस्थित होते. विशेष म्हणजे मंत्रालयातील कॅन्टीनमधील कर्मचारीही संपात सहभागी झाल्याने मंत्र्यांच्या कार्यालयात तसेच अधिकाऱ्यांना चहा मिळालेला नाही. आमदार निवासातील कर्मचारी देखील संपावर असल्याने आमदार निवासातही संपाचा फटका जाणवला.

सरकारचा खासगीकरणाचा डाव
राज्यात 300 खाटांची रूग्णालये सार्वजनिक-खासगी भागिदारी (पीपीपी) तत्वावर चालविण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला आहे. यातील सर्व तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची पदे ही आउटसोर्स करण्यात येणार आहेत अशी किमान 20 ते 25 हजार पदे संपूर्ण राज्यभरात असतील.मग यात आरक्षण कसे देणार असा सवालही सरदेशमुख यांनी केला.

संपाची सुरूवात झाल्यानंतर अद्यापपर्यंत राज्य सरकारच्या वतीने चर्चेसाठी कोणताही पुढाकार घेण्यात आलेला नाही.आमची चर्चेसाठी कोणत्याही क्षणी तयारी आहे.आमचे धोरणही लवचिक आहे.आडमुठी भूमिका आम्ही स्वीकारलेली नाही चर्चा करून प्रश्न सोडवावा असेच आमचे म्हणणे असल्याचे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

What is your reaction?
5 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)