सरकारविरोधात निदर्शने करणाऱ्या 75 जणांना मृत्युदंड

काहिरा (इजिप्त): सरकारविरोधात निदर्शने करणाऱ्या 75 जणांना इजिप्तच्या न्यायालयाने मृत्युदंड ठोठावला आहे. सन 2013 मध्ये माजी अध्यक्ष मोहम्मद मोरेसी यांच्या समर्थनासाठी राजधानी काहिरा येथे हिंसक निदर्शने झाली होती. या निदर्शनांदरम्यान सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात किमान 800 लोक मरण पावले होते. इजिप्तच्या न्यायालयाच्या या निर्णयाची अम्नेस्टी इंटरनॅशलने निंदा केली आहे. 800 लोकांचे प्राण घेणाऱ्या सुरक्षादलापैकी एकालाही शिक्षा न झाल्याने हा निर्णय हास्यास्पद आहे, अशी ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने टीका केली आहे.

अब्देल फतेह अल सिसी यांनी 3 जुलै 2013 रोजी लष्करी सत्तापालट केल्यानंतर निदर्शक मोरेसी यांच्या समर्थनार्थ लोक निदर्शने करत होते. निदर्शनाचे फोटो काढणारे पत्रकार महमूद अबू जैद यांनाही पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र खटल्याच्या काळात महमूद अबू जैद यांनी पाच वर्षे तुरुंगात काढल्याने त्यांची लवकरच सुटका होईल अशी अपेक्षा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)