सरकारला जाग आणण्यासाठी मोर्चात सहभागी व्हा – जाधव

उद्या घुले बंधुच्या नेतृत्वाखाली शेवगाव तहसीलवर मोर्चा
भावीनिमगाव – शेतकऱ्याच्या ज्वलंत प्रश्नावर झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी शेवगाव-पाथर्डी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शेवगाव तहसीलवर उद्या (दि.29) सकाळी 10 वा. माजी आ. नरेंद्र घुले व माजी आ. चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शेवगाव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब जाधव यांनी केले आहे.
जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शेवगाव-पाथर्डी तालुक्‍यात भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांचे संपुर्ण कर्ज माफ करा. शेवगाव-पाथर्डी तालुक्‍यातील बंद पडलेल्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा व स्वतंत्र पाणी योजनेचे विजबील माफ करून योजना तातडीने सुरू करा. दोन्ही तालुक्‍यातील मागेल त्या गावाला पिण्याचे पाण्याचे टॅंकर सुरू करून मंजुरीचे अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांना द्यावे. तालुक्‍यातील हुमणीग्रस्त ऊस पिकाचे पंचनामे करून एकरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्या, तालुक्‍यातील पशुधन वाचविण्यासाठी पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करणेसाठी मुळा धरणाचे 2 रोटेशन टेल टू हेड सोडा, शेवगाव पाथर्डी विद्युत भारनियमन तातडीने रद्द करा. शेवगाव-पाथर्डी व 54 गावे या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेला मंजूर झालेली पूरक नळ पाणी पुरवठा योजना तातडीने सुरु करा आदी विविध मागण्यांसाठी उद्या माजी आ. नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली एसटी बस स्टॅण्ड, क्रांती चौकापासून तहसील कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)