सरकारला कर्जमाफी करायची आहे की नाही? हाच मोठा प्रश्न – विखे पाटील

मुंबई, दि. 20 – पंजाबमधील कॉंग्रेस सरकारने अवघ्या अडीच महिन्यात अभ्यास करून 2 लाख रुपयांची सरसकट शेतकरी कर्जमाफी केली. महाराष्ट्र सरकारचा अभ्यास अजूनही अपूर्णच आहे, तो कधी पुर्ण होणार. पंजाबमधील कॉंग्रेस सरकारने दिलेली कर्जमाफी उत्तर प्रदेशपेक्षाही उत्तम आणि महाराष्ट्र सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. सरकारने चर्चेचा फार्स बंद करून तात्काळ सरसकट कर्जमाफी करा, असा सज्जड दम विखे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

माध्यांशी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने आता चर्चेचा फार्स बंद करावा. मुळात सरकारला शेतकरी कर्जमाफी करायची आहे की नाही, हाच मोठा प्रश्न आहे. सरकारने सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याऐवजी आता फक्त एक लाख रुपये माफ करण्याची भाषा केली जाते आहे. त्यातही कर्जमाफीसाठी पात्र ठरण्यासाठीच्या तारखेचा प्रश्न मोठा आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये कर्जाचे पुनर्गठन झाले होते. त्यामुळे 30 जून 2016 पर्यंतची थकबाकी माफ होणार असेल तर ती बहुसंख्य शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या निकषाबाहेर काढणारी ठरेल. त्यामुळेच थकबाकीची तारीख 31 मार्च 2017 असावी, अशी मागणी आम्ही यापूर्वीच केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)