सरकारने शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही – जयंत पाटील 

हिंगोली – नरेंद्र मोदी यांनी कर्जमाफी देतो असे सांगून पाच वर्षे झाली. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देतो असे सांगितले होते. या दोघांनाही आता जनतेचा विसर पडला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारवर आता जनतेचा विश्वासच राहिला नाही, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी लगाविला. या सरकारने शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही, असा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील सभा गुरुवारी हिंगोली जिल्हयात झाली. या सभेत जयंत पाटील यांनी सत्ताधारी भाजपावर टीका केली.

पाटील म्हणाले, भाजपा सरकार या देशात विकास करण्यात अपयशी ठरले आहे. नोकऱ्या देण्यात अयशस्वी आणि आश्वासनांचे गाजरे दाखवण्यात यशस्वी झाले आहेत. पाच वर्षे झाली, पण काळा पैसा आलेला नाही. या सरकारने फसवल्याचे देशातील जनतेला वाटत आहे. आता हीच जनता या सरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्राच्या पापात शिवसेनेचा 50 टक्के वाटा आहे. निव्वळ विरोध करण्याचे काम करत आहेत. जर विरोध करत आहात तर सत्ता का सोडवत नाही, असा सवालही त्यांनी शिवसेनेला विचारला.गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे हे शोधण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यांची हत्या कशी झाली याची चौकशी झालीच पाहिजे. आमची सत्ता आल्यास गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)